5G technologie : भारत -जपान ‘5 जी’ तंत्रज्ञानासंदर्भात संयुक्तपणे काम करणार | पुढारी

5G technologie : भारत -जपान '5 जी' तंत्रज्ञानासंदर्भात संयुक्तपणे काम करणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
5 जी ( 5G technologie ) दूरसंचार तंत्रज्ञानाच्या संदर्भात एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय भारत आणि जपान यांनी गुरुवारी ‘सायबर डायलॉग’ कार्यक्रमात घेतला. भारताकडून या कार्यक्रमात परराष्ट्र खात्याच्या सायबर डिप्लोमसी विभागाचे संयुक्त सचिव एम. साईवी तर जपानकडून त्यांच्या परराष्ट्र खात्याचे वरिष्ठ अधिकारी युकाता अरिमा यांनी सहभाग घेतला होता.

सायबर सिक्युरिटीसाठी व्यापकपणे काम करण्याची गरज असल्याचे साईवी यांनी यावेळी सांगितले. भारत आणि जपान यांच्या दरम्यान सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत, त्यांचा आढावाही घेण्यात आला. कार्यक्रमास गृह, संरक्षण मंत्रालय, नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सचिवालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, दूरसंचार खाते, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम तसेच नॅशनल क्रिटिकल आयआयआय सेंटरचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button