पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला एक वेगळे वळण मिळत आहे. गेले आठ दिवस शिंदे गटाचे बंड सुरु आहे. शिवसेनेचे बहुतांश आमदार सध्या आहेत. ठाकरे सरकारवरील संकट वाढतच असतानाच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावला आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी एक ट्विट करत त्यांना खाेचक टाेला लगावला आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी 'ईडी'ने संजय राऊत यांना २७ जूनला समन्स बजावले, त्यावरुन किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत संजय राऊत यांना खोचक टोला लावला होता की, संजय राऊतसाहेब, तुम्ही मला, माझा
पत्नीला, माझा मुलगा नीलला, आईला….. जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा, धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या; परंतु "हिसाब तो देना पडेगा "
संजय राऊत नियोजित दौऱ्यामुळे मंगळवारी 'ईडी'समोर चौकशीला हजर राहू शकले नाहीत. त्यांच्यावतीने वकील उपस्थित राहत विनंती अर्ज काल (दि. २८ जून) सादर केला. १४ दिवसांनी कागदपत्रांसह हजर होण्याची त्यांची विनंती 'ईडी'ने स्वीकारली आहे; पण आज सकाळी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत पुन्हा एकदा संजय राऊत यांना डिवचलं. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, संजय राऊतजी ईडी का बुलावा आया हैं, १ जुलै को जाना तो पडेगा. हिसाब देना तो पडेगा.
हेही वाचलंत का?