एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेला प्रतिउत्तर; “तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही” | पुढारी

एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेला प्रतिउत्तर; "तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही"

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे यांच्यासह १२ बंडखोर आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी तीन ट्विट करत शिवसेनेला प्रतिउत्तर दिले आहे. ‘आम्ही कायदा जाणतो, आमदारकी रद्द करण्याच्या असल्या धमक्यांना भीक घालत नाही’. ‘तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आम्ही केली आहे‘, असे शिंदे म्हणाले आहेत.

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत, असेही ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत, असे प्रतिउत्तरही शिंदे यांनी शिवसेनेला दिले आहे.

शिवसेनेने १२ आमदारांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. दरम्यान शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढत आहे. कृषीमंत्री दादा भुसे आणि माजी मंत्री संजय राठोडही शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यापुर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलही शिंदे गटात सामील झाले होते.

हेही वाचंलत का?

Back to top button