Sri Lanka Women vs India Women : श्रीलंकेविरुद्ध भारताचा दमदार विजय | पुढारी

Sri Lanka Women vs India Women : श्रीलंकेविरुद्ध भारताचा दमदार विजय

दाम्बुला (श्रीलंका); पुढारी ऑनलाईन : भारत आणि श्रीलंका दरम्यान (Sri Lanka Women vs India Women) खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला टी २० सामन्यात भारतीय संघाने लंकेला ३४ धावांनी पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने मर्यादित २० षटकांमध्ये ६ विकेट गमावून १३८ धावा उभारल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या १०४ धावांमध्ये गारद झाला. भारताकडून शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिगेज यांनी संघाला मजबूत धावसंख्या उभारुन देण्यात मोलाची भूमिका पार पाडली.

भारतीय फलंदाज (Sri Lanka Women vs India Women) जेमिमा रॉड्रिगेज हिच्या २७ चेंडूत ३६ धावांच्या खेळीमुळे गुरुवारी (दि.२३) महिला भारतीय संघाने पहिल्या टी २० सामन्यात श्रीलंकेच्या नियंत्रित गोलंदाजीसमोर सहा विकेट गमावून १३८ धावांचे आव्हान उभे केले. भारताची सर्व प्रकारातील नवी कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, श्रीलंकेने पहिल्यांदाच मोठे झटके देत सामान्याची दमदार सुरुवात केली. भारताची सलामीवीर स्मृती मानधना तिसऱ्या षटकात अवघ्या १ धावांवर बाद झाली. मोठा फटका खेळण्याच्या नादात अनुभवी ओशादी हिच्या गोलंदाजीवर मिडऑनवर चामरी आटपट्टूकडे झेल देऊन ती बाद झाली.

स्मृती बाद झाल्यावर मैदानात उतरलेली सभिनेनी मेघना ही पहिल्या चेंडूवर भोपळा न फोडता बाद झाली. त्यामुळे श्रीलंकेने (Sri Lanka Women vs India Women) सुरुवातील भारताला मोठे झटके दिले. यानंतर शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी या अडचणीच्या काळात सांभाळून फलंदाजी केली. शेफाली ३१ धावा करुन बाद झाली. यानंतर प्रभावी ठरणाऱ्या श्रीलंकन गोलंदाजांनी हरमनप्रीत कौर हिला २२ धावांवर बाद केले. यांच्यापाठोपाठ रिचा घोष हिला ११ धावांवर तर पूजा वस्त्रकार हिला १४ धावांवर बाद करण्यात श्रीलंकेला यश मिळाले.

यावेळी संघाची अवस्था १७ षटकामध्ये ६ बाद १०६ अशी बीकट झाली होती. यावेळी रॉड्रिगेजही संघाच्या मदतीला धावत जबाबदारीपूर्ण आणि आक्रमक फलंदाजी करत भारताची धावसंख्या १३८ पर्यंत पोहचवली. तिने २७ चेंडूत ३६ धावांची बहुमोल खेळी केली. तिला दीप्ती शर्माहिने ८ चेंडू मध्ये १७ धावाकरत महत्त्वाची साथ दिली.

Back to top button