एकनाथ शिंदेसह १२ बारा बंडखोरांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेची मागणी | पुढारी

एकनाथ शिंदेसह १२ बारा बंडखोरांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे यांच्यासह बारा बंडखोर आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, यामिनी जाधव, अनिल बाबर, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, लता सोनावणे, महेश शिंदे, बालाजी किनीकर या आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेने आमदारकी रद्द करण्याची मागणी केलेले सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील असून सध्या गुवाहाटीत आहेत. यानंतर विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटात कृषी मंत्री दादा भुसे, माजी मंत्री संजय राठोड हे देखील सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढत आहे. यापुर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलही सहभागी होते.

हेही वाचंलत का?

Back to top button