COVID19 | देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत १२,२४९ नवे रुग्ण, १३ मृत्यू | पुढारी

COVID19 | देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत १२,२४९ नवे रुग्ण, १३ मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,२४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ९,८६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील रुग्णसंख्या वाढल्याने देशातील सक्रिय रुग्णसंख्या ८१,६८७ वर पोहोचली आहे. तर दैनंदिन संसर्गदर ३.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. कालपासून सक्रिय रुग्णसंख्येत २,३७४ ने वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

याआधीच्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (COVID19) संख्येत घट झाल्याचे दिसून आले होते. याआधीच्या दिवशी कोरोनाचे ९,९२३ नवे रुग्ण आढळून आले होते. तर १७ जणांचा मृत्यू झाला होता. दिवसभरात ७,२९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. मंग‍ळवारी दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.५५ टक्के एवढा होता. तर कोरोनामुक्तीदर ९८.१६ टक्के आणि मृत्यू दर १.२१ टक्के होता. आतापर्यंत देशात १९६ कोटी ४५ लाख ९९ हजार ९०६ लसीचे डोस देण्यात आले आहे. काल एका दिवसात १२ लाख २८ हजार २९१ डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात ३,६५९ नवे रुग्ण

महाराष्ट्रात मंगळवारी ३,६५९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात मुंबईतील १,७८१ रुग्णांचा समावेश आहे. राज्यात कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानात कोरोनाची आणखी एक लाट

भारतासह जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शेजारील पाकिस्तानमध्ये आणखी एक कोरोना लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानमधील दोन शहरांतील कोरोनासंसर्गदर १० टक्क्यांच्या वर गेला आहे. मेक्सिकोतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सिंगापूरमध्ये ७,१०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Back to top button