कोरोनाचे संकट जाऊ दे; दोन वर्षांनंतर देहूत दाखल झालेल्या वारकर्‍यांचे साकडे | पुढारी

कोरोनाचे संकट जाऊ दे; दोन वर्षांनंतर देहूत दाखल झालेल्या वारकर्‍यांचे साकडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जगावर आलेले कोरोनाचे संकट जाऊ दे… संपूर्ण जगात शांतता, सुख आणि सुदृढ आरोग्य मिळू दे… असे साकडे मी पांडुरंगाला घातले आहे, असे सांगत होते परभणीचे वारकरी लक्ष्मणबुवा शिंदे. गेली दोन वर्षे पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट होते. दोन वर्षे वारकर्‍यांना पालखी सोहळ्यात सहभागी होता आले नाही.

यासंदर्भातील वारकर्‍यांचे अनुभव आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी वारकर्‍यांशी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. या वेळी दोन वर्षे पालखी सोहळ्यात सहभागी होता न आल्यामुळे दुख: होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यंदा वारी सोहळा साजरा करता येत असल्यामुळे वारकर्‍यांनी शासनाचे आभार मानले. त्याचबरोबर आनंद देखील व्यक्त केला.

हेही वाचा

पिंपरी: इंद्रायणीचा तीर वारकर्‍यांच्या भेटीने गहिवरला

नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, वैवाहिक असल्याचे लपवले

एकनाथ शिंदे यांच्या सोबत २९ आमदार, पक्षांतर बंदी टाळण्यासाठी लागणार ३७ आमदार

Back to top button