राष्‍ट्रपती निवडणूक : विरोधकांचा संयुक्त उमेदवार होण्यास फारुख अब्दुल्लांचा नकार | पुढारी

राष्‍ट्रपती निवडणूक : विरोधकांचा संयुक्त उमेदवार होण्यास फारुख अब्दुल्लांचा नकार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी संयुक्त विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून विचार करण्यासाठी आपले नाव “आदरपूर्वक मागे” घेण्याची घोषणा केली आहे. शनिवारी, विरोधकांना धक्का देत, त्यांनी यासंबंधी त्यांचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रपती निवडणुकीसाठी संभाव्य संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून ते उमेदवारी मागे घेत असल्याचे अब्दुल्ला यावेळी म्हणाले.

जम्मू-काश्मीर सध्या एका नाजूक टप्प्यातून जात आहे आणि अशा वेळी येथील लोकांना मदत करण्यासाठी येथे असणे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, अशी भावना निर्णय जाहीर करतांना त्यांनी व्यक्त केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी राष्ट्रपती निवडणूक संदर्भात विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी फारुख अब्दुल्ला आणि गोपाल कृष्ण गांधी यांच्या नावाचाही प्रस्ताव ठेवला होता. आता, २१ जून रोजी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत गोपाल कृष्ण गांधी यांच्या नावासह इतर कुठल्या नावावर चर्चा होणार आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button