ड्रग्‍ज प्रकरणी मुलाला अटक : शक्ती कपूर म्हणाले, “मी फक्त एक..." | पुढारी

ड्रग्‍ज प्रकरणी मुलाला अटक : शक्ती कपूर म्हणाले, “मी फक्त एक..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाॅलीवूड अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर याला ड्रग्ज सेवन प्रकरणी बंगळूर पाेलिसांनी अटक केली आहे. सिद्धांतच्या अटकेनंतर त्याचे वडील शक्ति कपूर यांनी प्रतिक्रिया दिली. “मी फक्त एक गोष्ट सांगू शकतो – ते शक्य नाही” असा दावा त्‍यांनी केला आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात चित्रपट आणि टीव्ही स्टार्सची अनेक नावे समोर येत आहेत. आता या यादीत सिद्धांत कपूरचेही नाव जोडले गेले. बंगळूर मधील एका पार्टीत सिद्धार्थला ‘डीजे’ म्‍हणून निमंत्रण होते. या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतलेल्या ३५ जणांची वैद्‍यकीय चाचणी केली. यामधील ६ जणांनी ड्रग्‍ज घेतल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. यामध्ये सिद्धांत कपूरची ड्रग्जची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सिद्धांतच्या अटकेनंतर त्याचे वडील शक्‍ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली. मी फक्त एकच सांगू शकतो आणि ते म्हणजे हे अशक्य आहे, असे त्यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button