‘ईडी’विरोधात कॉंग्रेसचे शक्तिप्रदर्शन नव्हे संताप : संजय राऊत  | पुढारी

'ईडी'विरोधात कॉंग्रेसचे शक्तिप्रदर्शन नव्हे संताप : संजय राऊत 

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा विरोध करण्यासाठी आज देशभरातील  ईडीच्या कार्यालयासमोर कॉंग्रैस धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदाेलनाबाबत माध्‍यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, ईडी विरोधातील देशभरातील कॉंग्रैसचे शक्तीप्रदर्शन नव्हे तर तो संताप आहे. आम्ही विरोधक ईडी पीडित आहोत.

 केंद्रीय तपास संस्‍था राजकीय सूडातून विराेधी पक्षांवर कारवाई करत आहेत. आज केंद्र सरकारविराेधात बाेलणार्‍यांच्‍या मागे चाैकशीचा सिमेमिरा  लावला जाताे आहे, असा आराेपही त्‍यांनी यावेळी केला.

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अपक्षांची नावं घेत गंभीर आरोप केले होते. यावेळी, देवेंद्र भूयार यांनी निराधार आरोप करू नका, आम्ही मविआ सरकारसोबतच आहोत असे माध्यमांशी  बोलताना विधान केले होते. या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र भूयार यांच्‍याशी चर्चा झाली. ते जे बाेलले ते प्रामाणिक हाेते. ते आमच्यासोबत आहेत.”

हेही वाचलंत का? 

Back to top button