Dress code : तुम्‍हाला काय वाटतं, हे सिनेमा थिएटर आहे ? : हाय कोर्टच्‍या न्‍यायाधीशांनी आयएएस अधिकार्‍याला ‘ड्रेस कोड’वरुन फटकारले | पुढारी

Dress code : तुम्‍हाला काय वाटतं, हे सिनेमा थिएटर आहे ? : हाय कोर्टच्‍या न्‍यायाधीशांनी आयएएस अधिकार्‍याला 'ड्रेस कोड'वरुन फटकारले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
बिहारमधील आयएएस अधिकार्‍याला ड्रेस कोडवरुन ( Dress code ) पाटणा उच्‍च न्‍यायालयाच्‍या ( हाय कोर्ट) न्‍यायाधीशांनी चांगलेच फटकारले. सध्‍या उच्‍च न्‍यायालयच्‍या सुनावणी ऑनलाईन होत आहेत. त्‍यामुळे न्‍यायाधीशांनी आयएएस अधिकार्‍याची घेतलेल्‍या ‘हजेरी’चा व्‍हिडीओ साेशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे.

Dress code : तुम्‍ही ‘आयएएस’ ट्रेनिंग घेतले आहे की नाही?

आनंद किशोर हे बिहारमधील वरिष्‍ठ आयएएस अधिकारी आहेत. त्‍याच्‍याकडे शहर विकास आणि गृहनिर्माण विभागाच्‍या सचिवपदाची जबाबदारी आहे. ते एका प्रकरणाच्‍या सुनावणीसाठी पाटणा उच्‍च न्‍यायालयात हजर होते. यावेळी त्‍यांनी खुल्‍या कॉलरचा पांढरा शर्ट परिधान केला होता. यावर न्‍यायाधीश म्‍हणाले की, “न्‍यायालयात येताना कोणत्‍या प्रकारचा ड्रेस कोड असतो याची तुम्‍हाला माहिती आहे की नाही? तुम्‍ही मसुरीमध्‍ये आयएएस ट्रेनिंग घेतले आहे की नाही? हे काय सुरु आहे. बिहार राज्‍यातील आयएएस अधिकार्‍यांना नेमकं काय झालं आहे? न्‍यायालयात येताना कसा ड्रेस असावायाचीही त्‍यांना माहिती नाही. फॉर्मल ड्रेस म्‍हणजे किमान कोट तरी घालावा. शर्टची कॉलर खुली असू नये.”

यावेळी आनंद किशोर यांनी आपल्‍या बाचावत सांगितले की, उन्‍हाळ्याचे दिवस असल्‍याने कार्यालयीन ड्रेस कोडमध्‍ये कोटाचा समावेश होत नाही. त्‍यांच्‍या हा खुलासा न्‍यायाधीशांना पटला नाही. जेव्‍हा तुम्‍ही न्‍यायालयासमोर सरकारी अधिकारी म्‍हणून हजर राहता तेव्‍हा एक ड्रेसकोड असतो. तुम्‍ही न्‍यायालयाला सिनेमा थिएटर समजता काय?, असा सवाल न्‍यायाधीशांनी या वेळी केला.

हेही वाचा : 

Back to top button