पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल रूग्णालयात दाखल | पुढारी

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल रूग्णालयात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रकाश सिंग बादल यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बादल यांना ६ जूनला देखील पोटाच्या आजारमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण ७ जूनला  त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डिस्जार्ज देण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून प्रकाश सिंग बादल हे पोटाच्या विकारांमुळेही त्रस्त होते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही त्‍यांना मोहालीच्या फोर्टीस रूग्णालयात दाखल केले होते.

जानेवारी महिन्यात कोरोनाची लागण

वर्षाच्या सुरूवातीलाच बादल यांना कोरोनाची लागण झाली होती. फेब्रुवारीमध्ये त्यांना कोरोनानंतर त्यांना आरोग्य चाचणी करण्यासाठी मोहालीच्या खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्या ह्रदयाची चाचणी करण्यात आली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते अनेक दिवस रूग्णालयात उपचार घेत होते.

हेही वाचलतं का?

Back to top button