Mamata Banerjee calls meeting : ममता बॅनर्जींनी आयोजित केली भाजप विराेधकांची बैठक | पुढारी

Mamata Banerjee calls meeting : ममता बॅनर्जींनी आयोजित केली भाजप विराेधकांची बैठक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee calls meeting) यांनी तमाम विरोधी पक्षांच्या नेत्यांची तसेच बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांची दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. ही बैठक १५ जून हाेणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक ममता बॅनर्जी यांच्याकडून बोलवण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्ष या बैठकीत डावपेच ठरविण्याची शक्यता आहे. दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशनल हॉलमध्ये या बैठकीची आयोजन करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार,  ममता बॅनर्जी (Mamata Banerjee calls meeting) यांच्याकडून बिगरभाजप मुख्यमंत्री  व भाजप शासित राज्‍यांतील विरोधी पक्षांचे नेत्‍यांना बैठकीसंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. डाव्या पक्षांनादेखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीची रणनीती ठरणार

तृणमूल काँग्रेसच्‍या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, राष्ट्रपती निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध मजबूत आघाडी करण्यासाठी बिगर भाजपशासित मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना ममता बॅनर्जी यांनी बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. १५ जून रोजी दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशनल हॉलमध्ये दुपारी ३ वाजता ही बैठक हाेणार आहे.

अरविंद केजरीवाल, पिनाराई विजयन, नवीन पटनायक, चंद्रशेखर राव, एम.के.स्टॅलिन, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन,  भगवंतसिंग मान या  मुख्यमंत्र्यांना  ममता बॅनर्जी यांनी  पत्र लिहून बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सम्राट पृथ्वीराज : अक्षयचा सलग दुसरा फ्लॉप; रिकाम्या थिएटरमुळे ओढावली ‘ही’ नामुष्‍की

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee calls meeting) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राजदचे लालू प्रसाद यादव, सीपीआयचे डी. राजा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, सीपीआयएमचे जनरल सेक्रेटरी सिताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरएलडीचे जयंत चौधरी, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वॉमी, माजी पंतप्रधान तथा जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष देवी गौडा, जम्मू ॲन्ड कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल, सिक्कीम डेमोक्रेटीक फ्रंटचे पवन चामलिंग, इंडियन युनियन मुस्लीम लिगचे कादर मोईद्दीन या विरोधी पक्षांच्या नेत्यांना देखिल ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे.

Back to top button