Rana couple : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल | पुढारी

Rana couple : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्‍यांचे आमदार पती रवि राणा यांच्याविरुद्ध (Rana couple) खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज (दि.८) बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात ८५ पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.

Rana couple त्यात २३ साक्षीदारांची जबानी नोंदविण्यात आली असून, या दोघांनाही येत्या १६ जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणे, शहरातील शांतता भंग करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राणा दाम्त्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या गुन्ह्यांत कारवाईसाठी गेलेल्या खार पोलिसांवर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अन्य एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होताच त्यांच्याविरुद्ध बुधवारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा हे न्यायालयात हजर नव्हते. त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांना आरोपपत्राची प्रत देण्यात आली होती.

आरोपपत्रात तपास अधिकार्‍यासह २३ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपपत्र सादर करुन घेताना न्यायालयात नवनीत राणा आणि रवी राणा यांना येत्या गुरुवारी १६ जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यांसह राणा दामत्यांविरुद्ध १५३ अ, १२४ अ, ३४ भादवी सहकलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला हाेता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button