IBPS RRB Recruitment 2022 : ग्रामीण बँकांमध्ये ८,१०६ पदांची बंपर भरती, जाणून घ्या तपशील | पुढारी

IBPS RRB Recruitment 2022 : ग्रामीण बँकांमध्ये ८,१०६ पदांची बंपर भरती, जाणून घ्या तपशील

पुढारी ऑनलाईन डेस्क

IBPS RRB Recruitment 2022 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने विविध ग्रामीण बँकांमध्ये ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज), ऑफिसर स्केल १, ऑफिसर स्केल २ आणि ऑफिसर स्केल ३ च्या एकूण ८,१०६ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. IBPS ने सोमवारी ६ जून २०२२ रोजी जारी केलेल्या भरती जाहिराती (CRP RRBs XI) नुसार, विविध राज्यांतील आरआरबीमध्ये विविध पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

आयबीपीएसने सीआरपी-आरआरबी XI च्या अंतर्गत एकूण ८,१०६ पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज ७ जून २०२२ पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार २७ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करु शकतात. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ८५० रुपये परीक्षा शुल्क भरायला हवे. अधिक माहिती अधिकृत वेबसाइट ibps.in वर उपलब्ध आहे.

करिअरचा ‘ग्रीन ऑप्शन’

कोण करु शकतात अर्ज?

ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पज)

या पदांसाठी अर्ज करण्‍यासाठी इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ अथवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १ जून २०२२ रोजी १८ वर्षापेक्षा कमी आणि २८ वर्षापेक्षा अधिक असू नये. आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

ऑफिसर स्केल १

कोणत्याही विषयात पदवीधर असायला हवे. १ जून २०२२ रोजी वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

ऑफिसर स्केल २

किमान ५० टक्के गुणांसह पदवीधर तसेच विहित विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे वय १ जून २०२२ रोजी २१ वर्षांहून कमी आणि ३२ वर्षांहून अधिक नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

ऑफिसर स्केल ३

BE / BTech / MBA (पदांनुसार शैक्षणिक अर्हता वेगवेगळी असेल). उमेदवाराचे वय १ जून २०२२ रोजी २१ वर्षांहून कमी आणि ४० वर्षांहून अधिक नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

‘या’ ग्रामीण बँकांमध्ये भरती (IBPS RRB Recruitment 2022)

आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक
आंध्र प्रगति ग्रामीण बँक
अरुणाचल प्रदेश ग्रामीण बँक
आर्यावर्त बँक
आसाम ग्रामीण विकास बँक
बंगिया ग्रामीण विकास बँक
बड़ौदा गुजरात ग्रामीण बँक
बडोदा राजस्थान क्षत्रिय ग्रामीण बँक
बडोदा यू पी बँक
चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक
छत्तीसगड राज्य ग्रामीण बँक
दक्षिण बिहार ग्रामीण बँक
एलाक्वाई देहाती बँक
हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक
जम्मू और कश्मीर ग्रामीण बँक
झारखंड राज्य ग्रामीण बँक
कर्नाटक ग्रामीण बँक
कर्नाटक विकास ग्रामीण बँक
केरळ ग्रामीण बँक
मध्य प्रदेश ग्रामीण बँक
मध्यांचल ग्रामीण बँक
महाराष्ट्र ग्रामीण बँक
मणिपूर ग्रामीण बँक
मेघालय ग्रामीण बँक
मिझोरम ग्रामीण बँक
नागालँड ग्रामीण बँक
ओडिशा ग्राम्य बँक
पस्चिम बंगा ग्रामीण बँक
प्रथम यूपी ग्रामीण बँक
पुदुवाई भरथिर ग्राम बँक
पंजाब ग्रामीण बँक
राजस्थान मरुधरा ग्रामीण बँक
सप्तगिरि ग्रामीण बँक
सर्व हरियाणा ग्रामीण बँक
सौराष्ट्र ग्रामीण बँक
तमिळनाडू ग्राम बँक
तेलंगाना ग्रामीण बँक
त्रिपुरा ग्रामीण बँक
उत्कल ग्रामीण बँक
उत्तर बिहार ग्रामीण बँक
उत्तराखंड ग्रामीण बँक
उत्तरबंगा क्षत्रिय ग्रामीण बँक
विदर्भ कोंकण ग्रामीण बँक

हे ही वाचा :

Back to top button