

पुढारी ऑनलाईन: अलीकडेच मोठया प्रमाणावर होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतुकीचे नियम आणखी कडक बनवण्यात आले आहेत. यामध्ये असे काही नियम आहेत, जर त्याकडे कोणी दुर्लक्ष केले, तर किमान १० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे चलन कापले जाण्याची शक्यता आहे. रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी कडक वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास भरधाव दंड ठोठावला जातो कारण वाहनचालकांनी रस्त्यावर चूक करण्याचे टाळावे.
सुधारित वाहतूक नियमांनुसार, जर एखादा वाहनचालक रस्त्यावर प्रेशर हॉर्न वाजवताना आढळला तर त्याला १० हजार रुपयांचे चलन भरावे लागेल. तसेच नो हॉर्न झोनमध्ये हॉर्न वाजवताना पकडल्यास चालकाला 2 हजार रुपयांचे चलन भरावे लागेल.
धोकादायक ड्रायव्हिंग ही भारतातील वाहनचालकांकडून होणारी सर्वात सामान्य वाहतूक चुकांपैकी एक आहे. धोकादायक वाहन चालवण्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी आणि रस्ते सुरक्षित करण्यासाठी त्याविरोधात कडक नियम करण्यात आले आहेत. ज्याचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिस वाहनधारकांना मोठा दंड आकारतात. डेंजरस ड्रायव्हिंग केल्यास सहा महिने ते एक वर्ष तुरुंगवास किंवा 1,000 ते 5,000 रुपये दंड अशी शिक्षा आहे. दंडाची रक्कम इतकी मोठी आहे की, डेंजरस ड्रायव्हिंग करण्यापूर्वी लोकांना दोनदा विचार करायला लावते.
ओव्हर स्पिडिंग
ओव्हर स्पीडिंग हे भारतीय रस्त्यांवरील अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. याविरोधात वाहतुकीचे कडक नियमही करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागतो. वेगवान वाहने ओळखण्यासाठी अनेक ठिकाणी वेग परीक्षण कॅमेरे रस्त्यावर बसविण्यात आले आहेत. हलक्या मोटार वाहन चालकाला ओव्हर स्पिडिंगसाठी पकडले गेल्यास 1,000 ते 2,000 रुपये दंड भरावा लागतो. मध्यम प्रवासी किंवा मालवाहू वाहनांच्या चालकांसाठी दंड हा 2,000 ते 40,000 एवढा आहे.