अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्यावर गुन्हा नोंद करा : कर्नाटक हायकोर्ट | पुढारी

अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्यावर गुन्हा नोंद करा : कर्नाटक हायकोर्ट

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : देशात विवाहसंबंधातील बलात्कार गुन्हा मानला गेला पाहिजे की नको याबद्दल मतमतांतरे असतानाच कर्नाटक उच्च न्यायलयाने एका महिलेच्या तक्रारीवरून नवऱ्यावर अनसैर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल कलम ३७७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच या प्रकरणात योग्य तपास न केल्याबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांनीही हे आदेश दिले आहेत.

२०१७ ला पीडित महिलेने तिच्या नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. नवरा जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पडतो, तसेच शारिरीक आणि मानसिक छळ करतो असे तक्रारीत म्हटले होते. तसेच नवऱ्याने अक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओही चित्रित केले होते, असेही तक्रारीत म्हटले होते. या व्हिडिओ क्लिप नवऱ्याने त्याच्या मित्रांनी पाठवल्याचा आरोप या महिलेने केला होता.

पण बंगळूर पोलिसांनी सप्टेंबर २०१९ ला चार्जशिट दाखल करत असताना, पोलिसांनी कलम ३७७ (अनैसर्गिक संबंध) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील या आधारे गुन्हा दाखल न करता फक्त घरगुती हिंसाचाराचे कलम (कलम ४९८ A) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

या संदर्भात न्यायमूर्तींनी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, ‘गुन्हा नोंद होत असताना त्यात सर्वच गुन्ह्यांचा उल्लेख आहे. पण बंगळुरू शहर पोलिसांनी जो तपास केला आहे ते गलथानपणाचे उदाहरण आहे. त्यामुळे चार्जशिटमध्ये घरगुती हिंचाराचा उल्लेख आहे.त्यामुळे या प्रकरणात पुन्हा तपास करण्याची गरज आहे.’

पोलिस महानिरीक्षकांनी तपास अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा असे पोलिसांनी म्हटले आहे.

Back to top button