नोटांवरील महात्‍मा गांधींच्‍या चित्राबाबत ‘आरबीआय’ने केला खुलासा

Indian Rupee
Indian Rupee

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय नोटांवर राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांचे चित्र पाहायला मिळते. मात्र काही रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच नोटांमध्‍ये मोठे बदल करणार अहे. हा बदल महात्‍मा गांधी यांच्‍या चित्राबाबत आहे. यावर आता आरबीआयने खुलासा केला आहे. तसेच या सर्व अफवा असल्‍याचेही स्‍पष्‍ट केले आहे.

एका रिपोर्टनुसार, आतापर्यंत देशात राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांचे चित्र असणार्‍या नोटांची छपाई होत होती. मात्र लवकरच यामध्‍ये आता बदल होणार आहे. नोटांवर रविंद्रनाथ टागोर आणि माजी राष्‍ट्रपती एपीजे अब्‍दुल कलाम यांचे चित्र दिसणार आहे. महात्‍मा गांधी यांच्‍यासह रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्‍दुल कलाम यांचे छायाचित्र वापराबाबत विचार सुरु असल्‍याचेही यामध्‍ये म्‍हटलं होतं.

नोटांवरील छायाचित्रात कोणताही बदल होणार नाही : आरबीआय

संबंधित रिर्पाटवर आरबीआयने खुलासा केला आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, भारतीय चलन व नोटांवरील छायाचित्रात कोणताही बदल करण्‍याचा प्रस्‍ताव नाही. यासंदर्भात सर्व अफवा आहेत. नोटांवरील महात्‍मा गांधी यांच्‍या चित्रामध्‍ये काेणताही बदल करण्‍यात येणार नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news