पुढारी ऑनलाईन डेस्क
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर तालिब हुसैन गुर्जर याला बंगळूर येथे जेरबंद केले. तो मोस्ट वॉटेंड दहशवादी होता. ही कारवाई १७ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केली.
हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड परिसरातील पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. येथील तरुणांना आमिष दाखवून संघटनेत सहभागी करुन घेतले जात होते. दहशतवादी तालिब हुसैन गुर्जर हा मागील काही दिवसांपासून पुन्हा सक्रीय झाला होता. बंगळूरमध्ये राहून तो काश्मीरमधील दहशतवादी कारवाया करत होता.
तालिब हा बंगळूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. १७ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तालिबच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे किश्तवाड पसिरातील दहशतवादी कारवायांना चाप बसेल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
मागील काही दिवस जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर दहशतवादी हल्ले होत आहेत. या टार्गेट किलंगची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली आहे. शनिवारीच श्रीनगर जिल्ह्यात कार्यरत असणार्या १७७ शिक्षकांच्या बदल्या सुरक्षेच्या कारणास्तव करण्यात आल्या आहेत. मागील पाच महिन्यात टार्गेट कलिंगमध्ये सहभाग सणार्या ४७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
तालिब हुसैन गुर्जर हा किश्तवाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला ५ मुले आहेत. किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह आणि दछन परिसरात तो शस्त्र घेवून फिरताना दिसयाचा. या परिसरातील दहशतवाद्यांची त्याला साथ होती. तालिबच्या कुटुंबीयांनी पोलिसांना संपर्क करत त्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली होती. मागील काही वर्ष तालिब हुसैन हा पासून हिजबुलच्या दहशतवादी कारवायात सहभागी होता. किश्तवाडमधील सर्व डोंगराळ रस्त्यांची माहिती आहे. २०१६ पासून तालिब हा गायब झाला होता. सुरक्षा दलांनी त्याला दहशतवादी घोषित केल्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते.
हेही वाचा :