Nepal Plane Missing : नेपाळमध्ये 22 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता!, 4 भारतीयांचा समावेश | पुढारी

Nepal Plane Missing : नेपाळमध्ये 22 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता!, 4 भारतीयांचा समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : चार भारतीयांसह 22 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नेपाळच्या विमानाचा रविवारी सकाळी नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तारा एअरच्या विमानाने पोखराहून जोमसोमला सकाळी 9.55 वाजता उड्डाण केले. पण त्यानंतर काही वेळाने विमानाशी संपर्क होऊ शकला नाही. विमानात चालक दलासह 22 जणांचा समावेश आहे. (Nepal Plane with 22 passengers including 4 Indians onboard loses contact)

हे विमान सकाळी 10.20 वाजता लँड होणार होते, मात्र दुपारचे साडे बारा वाजून गेल्यानंतरही ट्विन इंजिन असलेल्या विमानाचा अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. जोमसोम विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाच्या म्हणण्यानुसार, विमानाचा ज्या भागात शेवटचा संपर्क साधला होता त्या भागात शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. शेवटचा संपर्क लेटे पास येथे झाला होता. (Nepal Plane with 22 passengers including 4 Indians onboard loses contact)

2016 मध्ये ताराचे एक विमान बेपत्ता झाल्यानंतर उत्तर नेपाळच्या डोंगराळ भागात कोसळले होते. त्या दुर्घटनेत 23 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता.

Back to top button