देशात मागील २४ तासात २ हजार १२४ कोरोनाबाधितांची भर | पुढारी

देशात मागील २४ तासात २ हजार १२४ कोरोनाबाधितांची भर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात मागील २४ तासात २ हजार १२४ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, १७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, १ हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५%, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.४६% नोंदवण्यात आला.

देशातील एकूण ४ कोटी २६ लाख २ हजार ७१४ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात मिळवली आहे. तर, २४ हजार ९७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख २४ हजार ५०७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. राजधानी दिल्लीतील स्थिती नियंत्रणात असून, मंगळवारी ४१८ कोरोनाबाधित आढळले. २ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, ३९४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. राज्यातील कोरोना संसर्गदर २.६९ टक्क्यांनी कमी होत २.२७ टक्क्यांवर पोहचला आहे.

कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९२ कोटी ६७ लाख ४४ हजार ७६९ डोस लावण्यात आले आहेत. यातील ३.३१ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहे. खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ कोटी ३४ लाखांहून अधिक बूस्टर डोस लावण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १६ कोटी १४ लाख ७३ हजार ५९५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८४ कोटी ७९ लाखांहून अधिक कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ५८ हजार ९२४ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button