काँग्रेस सुधारणेसाठी राजकीय गटाची स्थापना : सोनिया गांधी | पुढारी

काँग्रेस सुधारणेसाठी राजकीय गटाची स्थापना : सोनिया गांधी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अंतर्गत सुधारणा आणि ‘भारत जोडो यात्रा’ यासाठी राजकीय घडामोडी गट, टास्क फोर्स- 2024 आणि केंद्रीय नियोजन गट स्थापन केला आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्‍या काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिरात ही पावले उचलण्यात आली आहेत. तर टास्क फोर्स-2024 मध्ये आठ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे, असे सोनिया गांधींनी सांगितले.

हे आहेत आठ सदस्‍य

सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या राजकीय घडामोडी गटात आठ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, आनंद शर्मा, केसी वेणुगोपाल आणि जितेंद्र सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.

टास्क फोर्स-2024 मध्ये प्रियंका गांधींचा समावेश

टास्क फोर्स-2024 मध्ये आठ नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, मुकुल वासनिक, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, अजय माकन, प्रियंका गांधी रणदीप सिंग सुरजेवाला आणि निवडणूक रणनीतीकार सुनील कांगोलू यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिग्विजय सिंह, सचिन पायलट, शशी थरूर यांच्यासह नऊ नेत्यांचा केंद्रीय नियोजन गटामध्ये असतील.

भारत जोडो यात्रा

उदयपूर येथे नवसंकल्प चिंतन शिबिरात पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्‍हणाले,  काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे समन्वय साधण्यासाठी नऊ सदस्यीय केंद्रीय नियोजन गटही तयार करण्यात आले आहेत. आणि 2 ऑक्टोबरपासून या यात्रेस सुरूवात होईल.

हेही वाचा  

Back to top button