suicide in nagpur : आर्थिक विवंचनेतून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

suicide in nagpur : आर्थिक विवंचनेतून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक विवंचनेतूनच दाम्पत्याने घरातील लोखंडी हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना  (suicide in nagpur) सोमवारी रात्री उघडकीस आली. कळमन्यातील गौरीनगर येथे उघडकीस आली. मनोज वासुदेव लोधी (वय ४५) व ममता मनोज लोधी (वय ४०) असे त्‍यांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मनोज यांचा जुनी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ते गौरीनगर परिसरात गेल्या तीन वर्षांपासून भाड्याने राहायचे. त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून मुलगा गोंदिया येथे आजीकडे राहतो. आर्थिक तंगीमुळे लोधी दाम्पत्य तणावात होते. त्यानंतर दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या (suicide in nagpur) केली.

कळमना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील व सहकार्‍यांनी घटनास्‍थळी पाहणी केली.  कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. लोधी दाम्पत्य मूळ गोंदियाचे. सुमारे पाच वर्षांपूर्वी मनोज यांनी त्यांच्या नावे असलेला भूखंड विकला. ते पत्नीसह नागपुरात आले. येथे त्यांनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आत्महत्येपूर्वी ममता यांनी त्यांच्या बहिणीला फोन केला. ‘आम्हाला खूप आर्थिक चणचण भासत आहे. जगणे कठीण झाले आहे’, असे त्या बहिणीला म्हणाल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button