‘एक स्टेशन, एक उत्पादन’ : रेल्वे स्थानकांवर ६ लाख ‘सेल्समन’ची होणार नियुक्ती | पुढारी

'एक स्टेशन, एक उत्पादन' : रेल्वे स्थानकांवर ६ लाख 'सेल्समन'ची होणार नियुक्ती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या ‘एक स्टेशन, एक उत्पादन’ या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत देशभरातील सहा लाखांहून अधिक बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने आपले धोरण जारी करत सात हजार रेल्वे स्थानकांवर सहा लाखांहून अधिक लोकांची सेल्समन पदासाठी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या भरतीत जास्तीत- जास्त दुर्बल घटकातील बेरोजगारांना प्राधान्य देण्याचे केंद्राचे धोरण असल्याचे म्हटलं आहे.

रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या धोरणात ‘एक स्टेशन, एक उत्पादन’ योजनेनुसार प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर किमान दोन कायमस्वरूपी स्टॉल कियोस्क उघडले जाणार आहेत. या स्टॉलसाठी कमीत-कमी प्रत्येक शिफ्टमध्ये दोन सेल्समन तैनात करण्यात येणार आहेत. प्लॅटफॉर्मवर कायमस्वरूपी स्टॉल-कियोस्कसोबत पोर्टेबल स्टॉल आणि ट्रॉली वाटप करण्याचा अधिकारही डीआरएम असेल असेही नमूद केले आहे.

तसेच रेल्वे बोर्ड सदस्य (वित्त)च्या मार्फत सर्व विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना वोकल फॉर लोकलच्या पदोन्नतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सध्याच्या स्टॉल-किओस्कच्या व्यवसायावर याचा परिणाम होणार नाही? याचीदेखील काळजी घेतली जाणार आहे.

तसेच सर्व स्टॉल-किऑस्क एकाच आकारात आणि दिसण्यात एकसारखे असावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या धोरणानुसार समाजातील दुर्बल घटक आणि उपेक्षित लोकांना स्टॉलचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये कारागीर, विणकर, बचतगटांसह केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार स्टॉल्स दिले जाणार असल्याचेही सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button