ज्ञानवापी खटला: हिंदू आणि मुस्लीम पक्षाला आक्षेप घेण्यासाठी ७ दिवसांची मुदत | पुढारी

ज्ञानवापी खटला: हिंदू आणि मुस्लीम पक्षाला आक्षेप घेण्यासाठी ७ दिवसांची मुदत

वाराणसी : पुढारी वृत्तसेवा
वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिर वादात ज्ञानवापीत जो सर्वे घेण्यात आला त्यावर हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही पक्षांच्या सूचना आणि आक्षेप सादर करण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. आता याप्रकरणी २६ मे रोजी सुनावणी होणार आहे.

या खटल्याची सुनावणी आता कोड ऑफ सिव्हिल प्रोसिडर नियम ११ ऑर्डर सात नुसार ही सुनावणी होणार आहे. हा खटल्यावर सुनावणीस मुस्लीम पक्षाने आक्षेप घेतला होता. वाराणसीच्या दिवाणी न्यायाधिशांनी हा आदेश देताना १९ मे २०२२ला कमिशनच्या रिपोर्टवर दोन्ही पक्षांकडून सूचना मागितल्या होत्या. हा आदेश अजूनही ग्राह्य असल्याने दोन्ही पक्ष त्यांचे आक्षेप ७ दिवसांत नोंदवू शकतात, असा आदेश जिल्हा आणि सत्रन्यायाधीश डॉ. ए. के. विश्वेश यांनी दिला.

हा खटला दिवाणी स्वरुपाचा आहे. यात हिंदू भाविकांनी मशिदीच्या आवारात पूजेची परवानगी मागितली आहे. याचिकाकर्त्यांनी ज्ञानवापी हे मुळचे मंदिर असून येथे हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
तर Places of Worship Act 1991 नुसार हा खटला चालवता येणार नाही, असा आक्षेप मुस्लीम पक्षाचा आहे. या कायद्यानुसार देशातील सर्व धार्मिकस्थळांची स्थिती १५ ऑगस्ट १९४७ला जी होती तीच ठेवायची आहे.

ज्ञानवापी खटल्‍यावर सोमवारी पहिल्यांदाच वाराणसी जिल्हा न्यायालयात तासभर सुनावणी झाली हाेती. यावेळी अंजुमन इंतजामिया मशीद समितीचे वकील अभय नाथ यादव यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवाला देऊन हिंदू पक्षाचा दावा न्यायालयाने ऐकण्यालायक नाही, असा युक्तिवाद केला. हा दावा होऊ शकतो का, यावर सुनावणी घ्या, अशी मागणी अ‍ॅड. यादव यांनी केली हाेती. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी त्यावर, ज्ञानवापीचा सर्व्हे रिपोर्ट कोर्टात वाचला जावा, दावा किती मजबूत आहे, हे लक्षात येईल, असा युक्तिवाद केला हाेता. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला हाेता.  मंगळवारी  न्यायालय आपला निकाल यावर देणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले हाेते.एकदा दाव्यावर सुनावणी सुरू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 8 आठवड्यांत वाराणसी न्यायालयाला हा दावा निकाली काढायचा आहे.

 

Back to top button