Ashok Khemka | 'मला माफ करा...!' तब्बल ५७ वेळा बदली झालेले IAS अधिकारी अशोक खेमकांची रिटायरमेंट पोस्ट व्हायरल

१९९१ बॅचचे IAS अधिकारी अशोक खेमका ३४ वर्षांच्या सेवेनंतर ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले
IAS officer Ashok Khemka
IAS अधिकारी अशोक खेमका यांची रिटायरमेंट पोस्ट.(Source- X)
Published on
Updated on

IAS officer Ashok Khemka retirement post viral

भ्रष्टाचाराविरुद्ध कडक भूमिका घेणारे १९९१ च्या बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी ३४ वर्षांच्या प्रामाणिक आणि संघर्षपूर्ण सेवेनंतर ३० एप्रिल २०२५ रोजी सेवेतून निवृत्त घेतली. निवृत्तीच्या दिवशी त्यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. जी काही वेळातच व्हायरल झाली.

''आज माझे IAS करियर पूर्ण झाले. माझ्या कुटुंबीयांचे, सहकाऱ्यांचे आणि सर्व हितचिंतकांचे आभार. ज्यांच्या अतूट पाठिंब्याशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता. या प्रवासादरम्यान माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो.'' असे अशोक खेमका यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

IAS officer Ashok Khemka
Pahalgam Terror Attack | तुम्हाला सुरक्षा यंत्रणांचं मनोबल खचवायचं आहे का? सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना खडसावलं

अशोक खेमका यांची भारतीय प्रशासकीय सेवेत असताना तब्बल ५७ वेळा बदली झाली. त्यांना त्यांच्या भूमिकेमुळे अनेकवेळा राजकीय दबावाचा आणि टीकेचा सामना करावा लागला. ३४ वर्षांच्या आयएएस कारकिर्दीत त्यांची नेहमीच भ्रष्टाचारविरुद्ध कडक भूमिका राहिली. वरिष्ठ आयएएस अधिकारी खेमका यांचे शेवटचे पोस्टिंग डिसेंबर २०२४ मध्ये हरियाणामधील परिवहन विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी झाले. ते या पदावरून आता निवृत्त झाले.

वाड्रा प्रकरणात राहिले चर्चेत

हरियाणा केडरचे खेमका पहिल्यांदा २०१२ मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा प्रकरणात चर्चेत आले आले. त्यांनी गुरुग्राम येथील वाड्रा आणि डीएलएफ यांच्यातील जमीन व्यवहारातील म्युटेशन रद्द केले होते. म्युटेशन ही जमिनीची मालकी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आहे. या निर्णयामुळे त्यांची एका प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख पुढे आली.

कोण आहेत अशोक खेमका? (Who is Ashok Khemka)

अशोक खेमका यांचा जन्म कोलकाता येथे ३० एप्रिल १९६५ मध्ये झाला. ते १९९१ बॅचे IAS अधिकारी आहेत. ते नुकतेच ३४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांनी आयआयटी खड्गपूर येथून कम्यूटर सायन्समधून बीटेक शिक्षण घेतले. तर त्यांनी टीआयएफआर येथून पीएचडी मिळवली. येथूनच त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्समधून एमबीए केले. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून एलएलबी शिक्षण घेतले.

तब्बल ५७ वेळा बदली...

त्यांची एकदा-दोनदा नव्हे तर ५७ वेळा बदली झाली. सरासरी दर सहा महिन्यांनी त्यांची बदली होत असे. त्यांच्या शेवटच्या पोस्टिंगमध्ये मंत्री अनिल विज यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या परिवहन विभागात परतले. त्यांनी याआधी या विभागात चार महिने काम केले होते. जवळजवळ एक दशकानंतर पुन्हा त्यांची बदली याच विभागात झाली. येथूनच ते निवृत्त झाले.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, मनोहर लाल खट्टर यांना लिहिले होते पत्र

२०२३ मध्ये खेमका यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पत्र लिहून दक्षता विभागामार्फत भ्रष्टाचाराला आळा घालण्याची विनंती केली होती. "माझ्या सरकारी सेवेतील कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी दक्षता विभागाचा प्रमुख म्हणून काम करण्याची इच्छा आहे. जर मला संधी मिळाली तर मी तुम्हाला आश्वासन देतो की भ्रष्टाचाराविरुद्ध खऱ्या अर्थाने लढा देईन आणि कोणीही कितीही उच्चपदावर असले तरी त्याला सोडले जाणार नाही," असे खेमका यांनी पत्रात लिहिले होते.

IAS officer Ashok Khemka
Rahul Gandhi: आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवा; जातनिहाय जनगणना कधी आणि कशी करणार ते सांगा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news