दीड महिन्यानंतर रुग्णालयात कोरोनाचे दोन रुग्ण | पुढारी

दीड महिन्यानंतर रुग्णालयात कोरोनाचे दोन रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

गेली दीड महिने शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित एकही रुग्ण दाखल नव्हता. मात्र, दोन रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नंदुरबार : नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची तापी नदीत उडी ; नावाड्यांनी वाचविले प्राण

कोरोनाच्या नव्या सात रुग्णांची नोंद रविवारी (दि. 22) झाली. तर, दिवसभरात 12 रूग्ण बरे झाले. शहरात सद्यस्थितीमध्ये एकूण 63 सक्रिय रूग्ण असून, त्यापैकी 61 रूग्ण होम क्वारंटाइन आहेत. आज 428 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, 691 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. शहरात 37 मायक्रो कन्टेन्मेंट झोन शिल्लक आहेत.

हे ही वाचा : 

शहरात पेव्हिंग ब्लॉक बसवताय ? जरा थांबा !

हर्षवर्धन पाटलांकडून जातीयवादाची विषपेरणी : राज्यमंत्री दत्ता भरणे

Back to top button