कॉंग्रेस १९८४ पासूनच रॉकेल शिंपडत आहे : राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपकडून समाचार | पुढारी

कॉंग्रेस १९८४ पासूनच रॉकेल शिंपडत आहे : राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपकडून समाचार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडन येथील कॅब्रिज विद्यापीठात आयोजित ‘आयडियाज फॉर इंडिया’ संमेलनात दिलेल्या वक्तव्यावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राहुल गांधी लंडनच्या कॅब्रिज विद्यापीठाच्या संमेलनात जावून देशाची प्रतिमा मलीन करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करतांना भारत मातेविरोधातच वक्तव्य करण्याची सवय राहुल गांधी आणि गांधी परिवाराला झाली आहे. राजकारणातून भाजप द्वेष समजून येतो. पंरतु, देशाबद्दलचे अपशब्द, तथ्यहीन आरोपांला भाजपचा विरोध आहे. देशवासिय देखील याला विरोध दर्शवतील, असे भाटिया म्हणाले.

रॉकेल घेवून कोण फिरत आहे, हे संपूर्ण देशाला माहिती आहे.कॉंग्रेस १९८४ पासूनच रॉकेल घेवून फिरत असल्याचा आरोप भाटिया यांनी केला. रॉकेल तर कॉंग्रेस पक्ष शिंपडत आहे. अगोदरपासूनच देशात आग धुमसत ठेवण्याचा कॉंग्रेसचा मानस राहीला आहे. हताश कॉंग्रेसचे अपयशी नेते राहुल गांधी यांच्याकडून विदेशच्या धर्तीवर करण्यात येणारे वक्तव्यांवरून कॉंग्रेस पार्टी १९८४ पासूनच देशात आग लावण्याच्या आणि सौहार्द बिघडवण्याचे काम करीत असल्याचे दिसून येते,असे भाटिया म्हणाले.
हेही वाचा : 

Back to top button