Bribes for visas case : कार्ती चिदंबरम यांनाही अटक होण्याची शक्यता | पुढारी

Bribes for visas case : कार्ती चिदंबरम यांनाही अटक होण्याची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पैसे घेऊन चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून दिल्याचा गंभीर आरोप झालेले (Bribes for visas case) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ती चिदंबरम यांना लवकरच अटक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात कार्ती यांचे निकटवर्तीय एस. भास्कर रमण यांना याआधीच सीबीआयने अटक केलेली आहे.

भास्कर रमन याला ट्रान्झिट रिमांडवर चेन्नईहून दिल्लीला आणले जाणार आहे. सीबीआयने गेल्या मंगळवारी देशभरात दहा ठिकाणी छापे टाकून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली होती. 2011 साली 263 चीनी नागरिकांना पैसे घेऊन व्हिसा उपलब्ध करून दिल्याचा आरोप कार्ती यांच्यावर आहे. भास्कर रमण चौकशीत सहकार्य करीत नसल्याने त्याची कोठडीत बसवून चौकशी केली जाणार आहे. भास्कर रमण याला यापूर्वी आयएनएस मीडिया प्रकरणात ईडीने अटक केली होती.

रमनची चौकशी झाल्यानंतर सीबीआयकडून कार्ती यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाऊ शकते. कार्ती यांनी चौकशीसाठी सहकार्य केले नाही तर त्यांना देखील अटक होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ज्यावेळी पैसे घेऊन व्हिसा (Bribes for visas case) देण्यात आले होते, त्यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यामुळे रमण आणि कार्ती यांच्या चौकशीनंतर सीबीआय पी. चिदंबरम यांना बोलावणे धाडू शकते.

 हे ही वाचा :

 

Back to top button