बूस्टर डोसच्या तुलनेत ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती अधिक, अभ्यासातून खुलासा | पुढारी

बूस्टर डोसच्या तुलनेत ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती अधिक, अभ्यासातून खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोनाचे येत असलेले नवीन व्हेरियंट जगाची चिंता वाढवत आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हा खूप धोकादायक मानला जातो. अशा परिस्थितीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ज्या लोकांनी कोरोना लसीकरण केले आहे. पण त्यानंतर ते ओमायक्रॉनने संक्रमित (Omicron infection) झाले असतील तर त्यांच्यात बूस्टर डोसच्या (booster shot) तुलनेत अधिक अँटिबॉडीज तयार होतात, असा खुलासा एका अभ्यासातून झाला आहे.

ज्या लोकांनी लस घेतली आहे आणि त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. पण कोरोना व्हायरसच्या अनेक व्हेरियंटशी लढण्यासाठी त्यांच्यात चांगल्या अँटिबॉडीज तयार होतात, असेही अभ्यासात आढळून आले आहे. लस निर्मिती करणारी बायोएनटेक एसई (‍BioNTech SE) आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी (University of Washington) ने यावर अभ्यास केला आहे. हा अभ्यास अहवाल बायोरेक्सिव सर्वरवर प्रकाशित झाला आहे.

सध्या आम्ही लोकांना बूस्ट करण्यासाठी एक वेगळी लस देण्याचा विचार करु शकतो, असे वॉशिंग्टन युनिवव्हर्सिटीचे सहाय्यक प्राध्यापक डेव्हिड वेस्लर यांनी म्हटले आहे. अभ्यास करणाऱ्या टीमने रुग्णाच्या नाकातील द्रवामध्ये (nasal mucous) अँटिबॉडी शोधल्या आहेत. ज्या मानवी शरिरात प्रवेश केल्यानंतर व्हायरसचा संसर्ग कमी करण्यास मदत करु शकतात.

जर एखाद्याला हल्लीच कोरोना झाला असेल तर ते आणखी एक बूस्टर डोस घेऊ शकतात, असे पेन्सिलवेनिया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉन वेरी यांनी ब्लूमबर्गशी बोलताना म्हटले आहे. जॉन वेरी यांना अँटिबॉडीजी संबंधित केलेल्या अभ्यासाचा आढावा घेतला आहे.
ज्या लोकांना ओमायक्रॉनचे संक्रमण झाले आहे त्यांच्यात चांगली प्रतिकारशक्ती दिसून आली आहे. तसेच भविष्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या संक्रमणाचा धोका कमी होईल की नाही, याची शाश्वती देऊ शकत नसल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button