'मला पत्नीला भेटू द्या', सुकेश चंद्रशेखरच तिहार करागृहात उपोषण | पुढारी

'मला पत्नीला भेटू द्या', सुकेश चंद्रशेखरच तिहार करागृहात उपोषण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग ( money laundering) प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याने पत्नीला भेटू देण्याच्या मागणीसाठी तिहार कारागृहात उपोषण सुरु केले आहे. 23 एप्रिलपासून सुकेशने उपोषण सुरू केले असून त्याचे वजन पाच किलोने कमी झाल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

रॅनबॅक्सी कंपनीचे पूर्वीचे मालक शिविंदर सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांच्याकडून २०० कोटींची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना पॉल हे दोघेही तिहार कारागृहात आहेत. स्वत:ला मोठा अधिकारी सांगून अब्जाधीश व्यावसायिकाच्या पत्नींची फसवणूक, जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही अशा बॉलिवूड अभिनेत्रींशी असलेले संबंध, त्यांना दिलेल्या महागड्या भेटवस्तू यांच्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. आता तर त्याने पत्नी लीनाला भेटण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी तरूंग प्रशासनाकडे केली आहे.

नियमानुसार सुकेश महिन्यातून दोनवेळा पत्नीला भेटू शकतो, पण त्याला दोनपेक्षा जास्त वेळा लीनाची भेट घ्यायची असल्याने तिहार तुरुंग प्रशासनाने परवानगी नाकारली. यामुळे कारागृहात सुकेशने उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या वीस दिवसांपासून सुकेश जेवत नसल्याने त्याला द्रवपदार्थ दिले जात आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती न्यायालयाला दिली जाणार असल्याचे तिहार प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचलंत का ?

Back to top button