पुणे : ट्रॅक्टर व कांदा चोरणाऱ्या आठजणांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : ट्रॅक्टर व कांदा चोरणाऱ्या आठजणांवर गुन्हा दाखल

पाटस : पुढारी वृत्तसेवा

पाटस (ता.दौंड ) येथे एक वर्षापूर्वी ट्रॅक्टर-ट्रॉली व दुचाकी, तसेच चार दिवसांपूर्वी शेतातून ४ टन कांद्याची चोरी केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना दौंड न्यायालयात हजर केले असता १४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत विठ्ठल तात्याबा डुबे यांनी यवत पोलिसांत फियार्द दिल्याची माहिती पाटस पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.

Ruturaj Gaikwad : गायकवाड असेल CSK चा पुढचा कर्णधार! माजी क्रिकेटरचे भाकीत

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विठ्ठल तात्याबा डुबे यांनी यवत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ संजय डुबे व वहिनी सुंदरा डुबे हे दोघे मयत झाल्यावर एक वर्षापूर्वी ५ लाख ९० हजार रुपयांचा ट्र’क्टर व दुचाकी पळवून नेण्यात आली. रविवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास ३० हजार रुपयांचा ४ टन कांदा चोरुन नेला. एकूण ६ लाख २० हजार रुपयांच्या वस्तूची चोरी केल्याप्रकरणी धुळा कोकरे, नवनाथ किसन कोकरे, अंजना धुळा कोकरे, किसन साहेबराव कोकरे, बायडाबाई किसन कोकरे, गणेश किसान कोकरे, प्रशांत धुळा कोकरे, स्मिता नवनाथ कोकरे या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोल्हापूर : विधवा प्रथा बंदचा क्रांतिकारी पॅटर्न राज्‍यात राबविणार : हसन मुश्रीफ

दौंड न्यायालयाने सुहास डुबे यांच्या शेतात जाण्यास मनाईचे आदेश दिले असतानाही आरोपींनी शेतात जाऊन कांदा पिक काढून घेत नुकसान केले. यातील गणेश किसान कोकरे, प्रशांत धुळा कोकरे,अंजना धुळा कोकरे, किसन साहेबराव कोकरे चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा

Monsoon : तयारीला लागा! मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

राजकारण नव्हे तर देशवासियांची सेवा हा आपला ध्यास ; पंतप्रधान मोदी

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

Back to top button