Accident In Telangana : तेलंगणा येथे भीषण अपघातात ९ ठार, १७ गंभीर जखमी

Accident In Telangana : तेलंगणा येथे भीषण अपघातात ९ ठार, १७ गंभीर जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणा राज्‍यातील कामारेड्‍डी जिल्‍ह्यात ट्रक आणि पिकअपमध्‍ये भीषण अपघात ( Accident In Telangana)  झाला. या दुर्घटनेत ९ जण जागीच ठार झाले असून, १७ जण गंभीर जखमी आहे. जखमींना बांसवाडा सरकारी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्‍यक्‍त केले आहे. तसेच मृतांच्‍या कुटुंबीयांना प्रत्‍येकी दोन लाख रुपये व जखमींना प्रत्‍येकी ५० हजार रुपयांची मदत त्‍यांनी जाहीर केली आहे.

पिटलम तालुक्‍यातील चियालर्गी गावातील ग्रामस्‍थ नातेवाईकांच्‍या दहाव्‍याच्‍या कार्यक्रमासाठी केले होते. हा कार्यक्रम झाल्‍यानंतर परताना पिकअपने भरधाव ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, पिकअपमधील दोघांचा जागीच मृत्‍यू झाला. तर सात जणांचा रुग्‍णालयात दाखल करताना मृत्‍यू झाल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news