पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन वर्षांपासून कोरोना ने देशात थैमान घातले आहे. देशातील शैक्षणिक संस्था ऑनलाईन सुरु आहेत. यातच मागिल काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका खासगी बँकेची एक जाहिरात व्हायरल होत आहे. ही जाहिरात नोकरीची आहे. या जाहिरातीमध्ये एका बँकेने काही अटी घातल्या आहेत. यात कोरोना काळात म्हणजेच २०२१ मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज न करण्याची अट घातली आहे.
त्यामुळे संबंधित बँकेची ती जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. अनेकांनी या जाहिरातीवर टीका केली आहे. मागील दोन वर्षापासून जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या आहेत.
ही जाहिरात बँकेच्या तामिळनाडूतील मदुराई शाखेने काढली आहे. या जाहिरातीमध्ये एक विशेष सूचना केली आहे. यात २०२१ मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करु नये, अशी अट लिहिण्यात आली आहे. काही तासातच ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या जाहिरातीची अनेकांनी खिल्ली उडवली. तर अनेकांनी त्या बँकेवर टीका केली आहे. यावर आता बँकेने स्पष्टीकरण देत झालेल्या चुकीबद्दल बँकेने खेद व्यक्त केली आहे. बँकेने आपली चूक मान्य केली आहे. आता नवी जाहिरात बँकेने प्रसिध्द केली आहे.
ही जाहिरात दोन दिवसांपूर्वी लागलेल्या एसएससी च्या निकाला नंतर सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता. याकाळात शाळ, महाविद्यालयेही बंद होते. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने क्लासेस सुरु होते. तसेच परिक्षाही ऑनलाईन पध्दतीने झाल्या. याला अनेकांनी विरोधही केला होता. पण फेब्रुवारी, मार्च या काळात कोरोनाचे रुग्ण देशात पुन्हा वाढले. त्यामुळे परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या हाेत्या.