खमंग गुलाबजाम भारतात आला कुठून? | पुढारी

खमंग गुलाबजाम भारतात आला कुठून?

पुढारी ऑनलाईन डेस्क : साखरेच्या पाकात घोळलेला मऊसूत आणि खमंग गुलाबजाम समोर दिसला की, तोंडाला पाणीच नाही तर स्वतःला आवरणंही कठीण होऊन जातं. कोणत्याही शुभ कार्यक्रमात पहिल्यांदा नजरेला पडणारा पदार्थ म्हणजे गुलाबजाम. पण, गुलाबजाम भारतात आला कुठून? काय आहे या पदार्थाचा इतिहास? त्याबद्दल आज जाणून घेऊ या…

पहिली अख्यायिका : दिल्लीच्या शहाजान यांना खूष करण्यासाठी शाही स्वयंपाकघरात आचारी (खानसामा) वेगवेगळे प्रयोग करत होते. विविध स्वीटडिश (मिष्टान्न) केल्या जायच्या. मात्र, यावेळी शहाजान यांच्यासाठी खानसामा रोजच्यापेक्षा वेगळी स्वीटडिश तयार करण्याच्या तयारीत होते.

या खानसामांना परदेशात पाहिलेली स्वीटडिश आठवली. पण, त्याला नेमकं काय म्हणतात हे माहीत नव्हतं. पण, तो पदार्थ कसा करायचा, याची माहिती होती. मग, सुरुवातीला त्यांनी खव्याचे लाडूसारखे गोळे केले. नंतर तेच गोळे  तुपात तळले.

ताे  पदार्थ गोड लागला नाही. मग खानसामांनी त्याला साखरेच्या पाकात भिजविले. त्यानंतर हा पदार्थ गोड लागला. पण, हा पदार्थ नुसताच गोड लागू लागला. त्याला खमंग वास येईना… त्यासाठी खानसामांनी एक शक्कल लढवली. त्यांनी त्या साखरेतल्या लाडुसारख्या पदार्थावर गुलाबाचं पाणी शिंपडलं. मग, त्याचा सुगंध आख्ख्या हवेलीत पसरला.

Gulab jamun

दुसरी अख्यायिका : असं म्हंटलं जातं की, हा बामियेचा सुधारित पदार्थ आहे. पण, ‘बामिया’, हा नेमका कोणता पदार्थ, हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. मध्यपुर्वेतील संस्कृतीतील माणसाने सर्वात पहिल्यांदा तयार केलेला पदार्थ म्हणजे बामिया. कोणतीही साधनं नसताना तयार केलेल्या पदार्थाला बामिया म्हंटलं गेलं.

पीठा गोळे करून भट्टीत भाजले गेले. नंतर तो पदार्थ स्वादिष्ट लागावा यासाठी मधामध्ये भिजवले गेले.

मध्य आशियात हा पदार्थ प्रसिद्ध होता. कालांतराने त्यात बदल होत गेला आणि शेवटी गुलाबजाम आधुनिक असं रुप त्याला मिळालं.

काहीही असो… भारतात हा पदार्थ पारंपरिक पदार्थांना मागे टाकत आहे. गुलाबजामने वेगवेगळी रुप धारणं केलेली आहेत.

त्यात लंबगोल, कवडी, शंख, जाळीदार, नक्षीदार अशी स्वरुपात गुलाबजाम आपल्याला आता स्विटमार्ट मिळतात. इतकंच नाही, तर त्यात फ्लेवरही पाहायला मिळतात.

बडिशोप फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर, केसर-वेलची फ्लेवर्स असे अनेक गुलाबजाम मिळताहेत.

पहा व्हिडीओ : कशी तयार कराल घरच्या घरी पावभाजी?

Back to top button