देशातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा दर सर्वाधिक | पुढारी

देशातील 'या' जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा दर सर्वाधिक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील या २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. या जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गदर ५ ते ४२ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मिझोरममध्ये सेरचिप जिल्हयाचा कोरोनाचा दर सर्वाधिक ४२.३२% नोंदवण्यात आला आहे.

तसेच, जिल्ह्यातील दर १०० पैकी ४२ नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग आढळत आहे. तर, मिझोरमधील सितोल जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना संसर्गदर ३८.६१% आहे. आसाम मधील लखीमपुर २०%, हरियाणातील गुरूग्राममध्ये १४.९३%, फरिदाबाद ११.३८% नोंदवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पितीचा कोरोना संसर्ग दर २५%, दिल्ली ५%, नोएडा १०.८६%, राजस्थानमधील धोलपुर ११.९७%, मध्यप्रदेशातील देवासचा कोरोना संसर्ग दर ७.५१ टक्के नोंदवण्यात आला आहे.

देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या गेल्या महिन्याभरात ६९.५४ टक्क्यांनी वाढली आहे. २ एप्रिल रोजी देशात ११ हजार २८७ कोरोनाबाधित होते. पंरतु दोन मे पर्यंत ही संख्या १९ हजार १३७ पर्यंत पोहचली आहे. गेल्या आठवड्याभरात देशातील २ हजार ५२० सक्रिय रुग्णांची वाढ झाली आहे. १९ ते २५ ते एप्रिल दरम्यान २ हजार ६६७ आणि १२ ते १८ एप्रिल १ हजार १७२ सक्रिय कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. देशात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज सरासरी २०० ते ६०० ने वाढ होत आहे.

हेही वाचा  

Back to top button