

पुढारी ऑनलाईन डेस्क :
हसताय ना…हसायलाच पाहिजे हे वाक्य तुम्ही ऐकलं असेलच णि ते खऱही आहे. आपण स्वत: हसायला हवेच आणि दुसऱ्यांनाही हसवायला हवे; पण सध्याच्या घडीला आपण हसणं विसरत चाललाेय का? प्रश्न तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर बहुतांश जणांच उत्तर याचं 'हो' असे येईल. बदलती जीवनशैली, स्पर्धेत टिकुन राहण्यासाठीची धावपळ, मागील दाेन वर्षांपासून जागतिक महामारीमुळे वाढलेला ताण-तणाव यात आपण आपलं नैसर्गिक हास्य विसरुन चाललाे आहोत; पण याचा परिणाम आपल्या शरीरावर होताेय. हसण्याचे बरेच फायदे असतात. ते आपण समजून घेणे गरजेचे आहे. हे समजले की, आपल्या आयुष्यात आनंदचं आनंद आहे. चला तर मग जागतिक हास्य दिनानिमित्त हसण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेवूया.
मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. हसण्यामुळे माणसाला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सहानुभूतिपूर्ण दुःखाचे प्रतिऔषध, अशी हास्याची व्याख्या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ विल्यम मॅक्डूगल यांनी केली आहे.
चला तर मग हसूया आणि हसवुया
हेही वाचलंत का?