कोरोनामुळे पुन्हा चिंता वाढली, २४ तासांत तब्बल १,३९९ रुग्णांचा मृत्यू

कोरोनामुळे पुन्हा चिंता वाढली, २४ तासांत तब्बल १,३९९ रुग्णांचा मृत्यू
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. पण अचानक वाढलेल्या रुग्णांच्या मृत्यूसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,४८३ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तब्बल १,३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा ५,२३,६२२ वर पोहोचला आहे. सध्या देशात कोरोनाचे १५,६३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दिवसभरात १,९७० रुग्णांनी कोरोनावर मात केली.

देशात गेल्या चार दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या २ हजारांहून अधिक नोंदवण्यात येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी दिवसभरात २ हजार ५४१ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३० लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान,१ हजार ८६२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.८४ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८७ कोटी ९५ लाख ७६ हजार ४२३ डोस देण्यात आले आहेत. यातील २.६६ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत २ कोटी ६७ लाख १३ हजार ३२९ बूस्टर डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९२ कोटी ७४ लाख २० हजार ७३५ डोस पैकी १९ कोटी ९३ लाख ६९ हजार ६६० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८३ कोटी ५० लाख १९ हजार ८१७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. ३ लाख २ हजार ११५ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याच माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news