पंतप्रधान मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यापूर्वीच जम्मूमध्ये स्फोट | पुढारी

पंतप्रधान मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यापूर्वीच जम्मूमध्ये स्फोट

श्रीनगर, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वीच जम्मूमध्ये स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. मोदी यांच्या कार्यक्रम स्थळापासून केवळ १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ललियाना गावात एका शेतात हा स्फोट झालेला आहे. तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे नाकारलेले आहे.

या प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, “जम्मूच्या बिश्नाहमधील ललियाना गावातील एका शेतात हा संदिग्ध स्फोट झाला आहे. वीज पडल्यामुळे किंवा उल्कापातामुळे हा स्फोट झाला असावा. पण, या हल्लाचा दहशतवादी हल्ल्याशी काही एक संबंध नाही”, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पीएम मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा बलाबरोबर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा झालेला होता. पोलीस खात्याचे प्रवक्ते म्हणाले की, “सुरक्षा बलाला काश्मीरच्या कुलगामच्या मिरहामामध्ये दहशतवादी लपून बसलेले आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा बल यांच्या चकमक झाली. त्यामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. अजूनही दोघांमध्ये चकमच सुरूच आहे”, अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली.

पहा व्हिडिओ : जंगलातल्या भारावून टाकणाऱ्या अचाट गोष्टी : अभिनेता हृदयनाथ जाधवसोबत

हे वाचलंत का? 

Back to top button