पंचायत राज दिवस : पंतप्रधान मोदींची जम्मू-काश्मीरमध्ये आज मोठी जनसभा | पुढारी

पंचायत राज दिवस : पंतप्रधान मोदींची जम्मू-काश्मीरमध्ये आज मोठी जनसभा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलम ३७० हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये जनसभा घेणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी केंद्रशासित प्रदेशांना २० हजार कोटी रुपयांहून अधिक विकास योजनांची भेट देणार आहेत. याशिवाय ३८ हजार कोटी रुपयांचा नियोजित प्रस्तावादेखील प्रत्यक्षात लागू करणार आहेत. (पंचायत राज दिवस)

राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान मोदी सांबा जिल्ह्याच्या पल्लीमधून देशभर पंचायतीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत. पल्लीमधून मोदी अमृत सरोवर योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ७५ पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी दिल्ली-कटडा एक्सप्रे-वे, दोन जलविद्युत प्रकल्पांचे शिलावरण आणि त्याचबरोबर ३८ हजार कोटी रुपयांचे औद्योगिक योजनांचे भूमीपूजन करणार आहेत. दरमान्य, देश-परदेशातून काही पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शिवाय काजीगुंड-बनिहाल सुरंग आणि १०८ जनऔषधी केंद्रांचेदेखील लोकार्पण केले जाणार आहे. (पंचायत राज दिवस)

पल्ली पंचायतीमध्ये जनसभेनंतर पंतप्रधान मोदी ग्रामसभेत सहभागी होणार आहेत. त्यावेळी ते पल्लीत ५०० मेगावॅटचा सोलर प्लांटदेखील लोकार्पण करणार आहेत. यातून पल्ली पंचायत देशात पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत होणार आहे. भूमी स्वामित्व कार्डचेदेखील वितरण केले जाणार आहेत.

पहा व्हिडिओ : उस्मानाबाद : लेकीच्या जन्माचा सोहळा साजरा केला हत्तीवरून जिलेबी वाटून | osmanabad Elephant |

Back to top button