वाट खडतर!
वाट खडतर!

गुजरातमध्ये काँग्रेसचे हार्दिक पटेल भाजपचे ‘कमळ’ हाती घेण्याच्या तयारीत?

Published on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईल डेस्‍क : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसू शकतो. गुजरातच्या PCC (स्टेट काँग्रेस कमिटी) चे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या हायकमांडवर नाराजी व्यक्त करत भाजपचे कौतुक केले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

हार्दिक पटेल म्हणाले की, मी रामाचा भक्त आहे. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला मी भगवद्गीतेच्या 4,000 प्रती वितरित करणार आहे. मला हिंदू धर्माचा अभिमान आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला बलाढ्य शत्रू म्हणत कमी लेखू नये, असा त्यांनी सल्ला दिला. दरम्यान, प्रदेश भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी हार्दिक पटेलच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे.

पाटीदार आंदोलनातून राजकारणाला हार्दिक पटेल यांनी सुरूवात केली होती. त्‍यानंतर त्‍यांनी राज्याच्या राजकारणात स्वत:चा वेगळाच ठसा उमटवला. ते गुजरात काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी आहेत. मात्र आता त्यांना पक्षात फारसा रस वाटत नसल्याचे चित्र आहे.

आम्‍ही पण राम भक्‍त

माध्यमांशी बोलताना ते म्‍हणाले, मी स्वतःला राम भक्त आहे. आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान आहे. हार्दिक पटेलने वडिलांच्या मृत्यूच्या विधीसाठी 'भगवत गीता' वाटल्या होत्‍या. तसेच त्‍यांनी दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली आहे. असे ते म्‍हणाले.

अध्यक्ष सीआर पाटील यांनी केले कौतुक

हार्दिक पटेलने स्वतःला रामभक्त म्हटल्यानंतर हार्दिक पटेल यांचे भाजपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष सीआर पटेल यांनी कौतुक केले आहे. तसेच हार्दिक पटेल भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. परंतु पटेल यांनी देखील याबाबत काहीही संकेत दिले नाहीत.

काँग्रेसमध्ये वेळ का घालवायचा ; आपचे आमंत्रण

हार्दिक पटेलच्या नाराजी दरम्यान, गुजरात आम आदमी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी त्यांना पक्षात येण्याचे खुले आमंत्रण दिले होते. गोपाल इटालिया म्हणाले की, जर हार्दिक पटेलला काँग्रेसमध्ये पसंत केले जात नसेल तर त्यांनी समविचारी पक्षात सामील व्हावे. तक्रार करण्याऐवजी किंवा वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांनी पक्ष बदलून त्‍याचे योगदान दिले पाहिजे. असे इटालिया  म्‍हणाले.

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news