Gautam Adani : …तर देशातील कोणीही उपाशी झोपणार नाही : गौतम अदानी | पुढारी

Gautam Adani : ...तर देशातील कोणीही उपाशी झोपणार नाही : गौतम अदानी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत २०५० पर्यंत ३० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनला, तर देशातील कोणीही उपाशी झोपणार नाही. आम्ही २०५० पासून जवळपास १० हजार दिवस दूर आहोत. या कालावधीत आपण आपल्या अर्थव्यवस्थेत सुमारे २५ हजार अब्ज डॉलर्सची भर घालू, असा विश्वास उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani)  यांनी व्यक्त केला. ते टाईम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

(Gautam Adani) अदानी म्हणाले की, दिवसाला २.५ अब्ज डॉलर्सची कमाई होते. त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या गरिबीला मागे टाकू. जर योजनेनुसार अर्थव्यवस्था वाढली, तर या १० हजार दिवसांत शेअर बाजाराचे बाजार भांडवल सुमारे ४० हजार अब्जने वाढेल. जे २०५० पर्यंत दररोज ४ अब्ज डॉलर्स बनते. या कालावधीत १.४ अब्ज लोकांचे जीवन सुधारणे एखाद्या मॅरेथॉनसारखे वाटू शकते, परंतु ते अधिक काळासाठी ‘स्प्रिंट’ (वेगवान धावणे) सारखे आहे.

दरम्यान, जागतिक बँकेने देशातील गरिबीवरील आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, २०११ ते २०१९ या कालावधीत भारतातील अत्यंत गरिबीत १२.३ टक्के घट झाली आहे. २०११ मधील २२.५ टक्क्यांवरून २०१९ मध्ये १०.२ टक्के इतकी घसरण झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button