३८ डिग्री तापमानात बस थांब्यांवर प्रवाशांची होरपळ: ऑन द स्पॉट | पुढारी

३८ डिग्री तापमानात बस थांब्यांवर प्रवाशांची होरपळ: ऑन द स्पॉट

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पीएमपी ठेकेदारांनी शुक्रवारी सकाळी अचानक पुकारलेल्या संपामुळे शहरासह उपनगरातील बस थांब्यावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यातच पुण्यात 38 अंश सेल्सिअस तापमानाच्या कडाक्यात प्रवासी बसच्या प्रतिक्षेत पुर्णत: बेहाल झाले आहे.

जम्मूमध्ये भीषण चकमक; ४ दहशतवादी ठार, तर १ जवान शहीद

पीएमपी ठेकेदारांना कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत माहिती मागविल्याचा राग धरून ठेकेदारांनी आज संप पुकारल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले. तर आमचे थकबाकीचे पैसे दिल्यानसल्यामुळे आम्ही संप करत असल्याचे ठेकेदार सांगत आहेत. परंतु, या वादात पुणेकर प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, भर उन्हामध्ये प्रवाशांना बसची वाट पहात ताटकाळत उभे राहावे लागत आहे. सध्या पीएमपीच्या स्व: मालकीच्या गाड्या रस्त्यावर सेवा पुरवत आहेत. मात्र, ठेकेदारांच्या बस मार्गावरून कमी झाल्यामुळे मार्गावरील बस गाड्यांची वारंवारिता खूपच कमी झाली आहे. परिणामी, प्रवाशांचे हाल होत असून, उन्हामध्येच प्रवाशांना वाट पहावी लागत आहे.

कोरोना अपडेट | देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत २,४५१ नवे रुग्ण, ५४ मृत्यू

पीएमपीची एसी बसची सेवा बंद

ओलेक्ट्रा कंपनीच्या ठेकेदाराने संप पुकारल्यामुळे आज एसी बस बंद आहेत. भर उन्हात काही प्रमाणात का होईना दिलासा देणार्‍या एसी बस बंद झाल्यामुळे प्रवासी नाराज झाले आहेत. त्यांना साध्याच बसने आज प्रवास करावा लागत आहे. तात्काळ अंतर्गत वाद मिटवून बस गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवशांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा

Electric Scooter : ई-बाईकच्या दुर्घटना टाळण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत : मंत्री नितीन गडकरी

नाशिक : 18 गुंठे ज्वारीच्या पिकात पक्ष्यांचा मुक्त संचार; दुष्काळात दिलासा

नवाब मलिकांना आणखी एक दणका, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

Back to top button