‘लव्ह जिहाद’ : मुस्लिम तरुण-ख्रिश्चन तरुणीतील नात्यात हस्तक्षेपास कोर्टाचा नकार | पुढारी

'लव्ह जिहाद' : मुस्लिम तरुण-ख्रिश्चन तरुणीतील नात्यात हस्तक्षेपास कोर्टाचा नकार

कोची : पुढारी ऑनलाईन : केरळमध्ये एकत्र राहात असलेल्या मुस्लिम तरुण आणि ख्रिश्चन तरुणी यांच्या नात्यात हस्तक्षेप करण्यास केरळ उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ख्रिश्चन तरुणीच्या वडिलांनी या संदर्भात न्यायालयात धाव घेतली होती.

संबंधित तरुणी स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे,  दोघांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली विवाहाची नोंदणी व्हावी, यासाठी अर्ज केला आहे, हे लक्षात घेता दोघांतील नात्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असा  कोर्टाने स्‍पष्‍ट केले.  न्यायमूर्ती व्ही. जी. अरुण आणि सी. एस. सुधा यांनी हा निर्णय दिला. संबंधित तरुणीचा जबाब नोंदवल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. या तरुणाचे नाव शेजिन असून तरुणीचे नाव जोईस्ना मेरी जोसेफ असे आहे.

शेजिन हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता आहे. दोघांच्या एकत्र राहाण्याच्या निर्णयावर केरळमध्ये मोठा वाद झाला होता. शेजिनवर ‘लव्ह जिहादचे’ आरोपही झाले होते. काही ख्रिश्चन नन्सनी या विरोधात आंदोलनही केले होते. विशेष म्हणजे कम्युनिस्ट पार्टीच्या एका पदाधिकाऱ्यानेच ‘लव्ह जिहाद’चा उल्लेख केला होता. त्यानंतर या पक्षाने आंतरधार्मीय विवाहांना आपला पक्ष लव्ह जिहाद म्हणत नाही, असा खुलासा केला.

शेजिन आणि जोसिना यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन स्पेशल मॅरेज ॲक्टखाली विवाहाची नोंदणी व्हावी, असा अर्ज होता, त्यानंतर दोघांनी एकत्र राहायला सुरुवात केली होती. जोसिनाच्या वडिलांनी याला आक्षेप घेत उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button