पंतप्रधान मोदी गुरुवारी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधन करणार

पंतप्रधान मोदी गुरुवारी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधन करणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गुरु तेगबहादुर यांच्या चारशेव्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 तारखेला लाल किल्ल्यावरुन संबोधन करणार आहेत. अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून सोमवारी देण्यात आली. 15 ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्य दिनाचे संबोधन वगळता अन्यवेळी पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन सहसा संबोधन करीत नाहीत. त्यामुळे येत्या गुरुवारी पंतप्रधान काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुघलांच्या जुलूम आणि अत्याचाराविरोधात आयुष्यभर लढा दिलेल्या गुरु तेगबहादूर यांचा चारशेवा प्रकाशपर्व येत्या गुरुवारी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करतील. यावेळी गुरु तेगबहादूर यांच्या सन्मानार्थ एक विशेष नाणे आणि पोस्टेज स्टँपदेखील जारी केले आहे.

याशिवाय चारशे संगीतकारांचा सहभाग असलेला शब्द किर्तन हा कार्यक्रम यावेळी होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाबरोबरच दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. देश-विदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्‍थिती लावतील, असे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने सांगितले.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news