वाशिम : पिस्तुलचा धाक दाखवून लूटमार करणारे तिघे जेरबंद | पुढारी

वाशिम : पिस्तुलचा धाक दाखवून लूटमार करणारे तिघे जेरबंद

वाशिम : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपावर पिस्तुलचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात असेंगाव पोलिसांना यश आले आहे. प्रिन्स होलपदे, देवानंद धुधमोगरे, एकनाथ चव्हाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, ते सर्वजण हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

वाशिम-मंगरूळपीर रोडवरील बीटोडा येथील पेट्रोल पंपावर पिस्तुलचा धाक दाखवून चोरी केल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याआधारे शोध घेत असेंगाव पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, असेंगाव पोलिसांनी त्या तिघांची कसून चौकशी केली. नांदेड, परभणी, यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर चोरी केल्याची कबुली तिघांनी दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button