अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष वत्स यांना एक वर्षाची मुदतवाढ | पुढारी

अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष वत्स यांना एक वर्षाची मुदतवाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अणुऊर्जा आयोगाचे (एईसी) अध्यक्ष कमलेश वत्स यांना केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने वत्स यांचा कार्यकाळ वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कार्मिक मंत्रालयाकडून देण्यात आली.

दरम्‍यान, वत्स यांना देण्यात आलेली ही दुसरी मुदतवाढ आहे. वडोदरा येथील एमएस विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर १९७९ साली वत्स बीएआरसीमध्ये रुजू झाले होते. बीएआरसीत अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. तर इंडियन न्यूक्लिअर सोसायटीचा उत्तम सेवा पुरस्कार, डीएई तसेच होमी भाभा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कारासह इतर पुरस्कार मिळाले आहेत. २०१८ साली त्यांची अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती झाली होती. आता त्‍यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button