Upahar’ cinema : दिल्लीतील बहुचर्चित ‘उपहार’ सिनेमागृहाला पुन्हा आग | पुढारी

Upahar' cinema : दिल्लीतील बहुचर्चित 'उपहार' सिनेमागृहाला पुन्हा आग

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील ग्रीनपार्क भागातील ‘उपहार’ सिनेमागृहाला (Upahar’ cinema) १९९७ साली भीषण आग लागून ५९ लोक मृत्यूमुखी पडले होते. जे. पी. दत्ता यांचा ‘बॉर्डर’ सिनेमा सुरु असताना ही आग लागली होती. त्या दुर्दैवी घटनेनंतर अवघा देश हळहळला होता. हेच उपहार सिनेमागृह रविवारी लागलेल्या आगीने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

१९९७ सालच्या त्या घटनेपासून उपहार सिनेमागृह (Upahar’ cinema) बंदच आहे. मात्र, त्यात जुने सामान आणि फर्निचर ठेवण्यात आलेले आहे. रविवारी सकाळी या सामानाला आग लागली. आणि १९९७ च्या कटू आठवणी जाग्या झाल्या. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आग, धुरामुळे श्वास कोंडणे तसेच चेंगराचेंगरी होऊन ९७ साली लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी शंभरपेक्षा जास्त लोक जखमी देखील झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button