राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार | पुढारी

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. भोंगे काढण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला ३ मेचा अल्टिमेटम दिला आहे. आज  त्यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. ५ जून रोजी अयोध्येला जाणार असून श्री रामाचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

५ जून रोजी राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शनिवारी त्‍यांच्‍या हस्‍ते हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी महाआरती करण्यात आली होती. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, “भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. भोंग्याच्या आवाजाचा त्रास हा हिंदूनाच होत नाही, तर मुस्लिमांनादेखील होत असल्याचे एक उदाहरण देऊन सांगितले की, “एका मुस्लिम पत्रकाराच्या लहान बाळाला भोंग्याचा त्रास झाला. त्यानंतर त्या पत्रकाराने स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितले. हा किस्सा त्या मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितला होता”.

पुणे : ‘सदावर्तेंना बांगड्या भरल्यास ५ लाखांचे बक्षीस’

या वेळी राज ठाकरे म्‍हणाले, माणुसकीच्या नात्याने मुस्लिमांनी भोंगे बंद करावेत. आम्हाला राज्यातील शांतता भंग करायची नाही; पण भोंगे बंद करा. पाच वेळा भोंगा लावत असाल तर आम्ही पाचवेळी हनुमान चालिसा वाजविणार आहे. देशापेक्षा धर्म मोठा असा कामा नये. आमच्याही हातात शस्त्रे आहेत, ते आम्हाला हातात घेण्यास भाग पाडू नका, असा इशाराही त्‍यांनी या वेळी दिला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button