मुश्ताक अहमद जरगर दहशतवादी घोषित, कंधार विमान अपहरणावेळी केली होती सुटका | पुढारी

मुश्ताक अहमद जरगर दहशतवादी घोषित, कंधार विमान अपहरणावेळी केली होती सुटका

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

केंद्रीय गृह मंत्रालयाने अल उमर-मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि मुख्य कमांडर मुश्ताक अहमद जरगर याला बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. जरगर हा १९९९ मधील इंडियन एअरलाइन्सच्या कंधार विमान अपहरणात भारत सरकारने प्रवाशांच्या बदल्यात सोडलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक होता. जरगर हा काश्मिरी दहशतवादी असून सध्या तो पाकिस्तानात राहत आहे.

इंडियन एअरलाइन्सचे विमान IC-८१४ चे २४ डिसेंबर १९९९ रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथून अपहरण करण्यात करण्यात आले होते. हे विमान काठमांडूतून दिल्लीला जाणार होते. पण अपहरणकर्त्यांनी त्याला कंधार, अफगाणिस्तानात नेले. त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. IC-८१४ विमानाच्या अपहरणात सहभाग असलेल्या जहूर मिस्त्री उर्फ​​जाहिद अखुंद याची गेल्या महिन्यात पाकिस्तानातील कराचीत हत्या झाली. जहूर मिस्त्री हा डिसेंबर १९९९ च्या कंधार विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच अपहरणकर्त्यांपैकी एक होता. मिस्त्री गेली अनेक वर्षे खोटी ओळख दाखवून कराचीत रहात होता. तो कराचीतील अख्तर कॉलनीत फर्निचरचे काम करत होता.

हे ही वाचा : 

Back to top button